लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबतचे मेसेज निव्वळ अफवा , ट्विटरच्या माध्यमातून खुलासा
लता मंगेशकर ( photo credit : Twitter)

Lata Mangeshkar Health Issue Rumores: भारताची गानकोकिळा अशी ओळख असलेल्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या आरोग्याबाबत मागील काही दिवसांपासून अनेक चर्चा, अफवा आणि मेसेज पसरत होते. मात्र आज लता मंगेशकर यांनी ट्विटरच्या माध्यामातून इंटरनेटवर फिरत असलेले फोटो, मेसेज खोटे असल्याचे म्हटले आहे. लता मंगेशकरांच्या प्रकृती बाबत गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियामध्ये काही खोटी वृत्त पसरवली जात आहे.

लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली असून त्यांना रूग्णालयामध्ये दाखल केले आहे अशा आशयाचे, खंगलेल्या अवस्थेमधील लता मंगेशकरांचे फोटो सोशल मीडियामध्ये पसरत आहेत. मात्र लता मंगेशकरांनी आपली प्रकृती उत्तम असून स्वतःच्या घरी असल्याची माहिती लता मंगेशकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

लता मंगेशकर यांचं ट्विट  

काही दिवसांपूर्वी लता मंगेशकरांनी संगीत क्षेत्रातून निवृत्ति घेतली असून भविष्यात त्या गाणार नसल्याच्या बाबतीतील महितीदेखील अशाचप्रकारे सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली होती.

लता मंगेशकर सध्या 89 वर्षांच्या आहेत. मुंबईतील कफ परेड भागात लता मंगेशकर राहतात. भारतीय संगीत क्षेत्रामध्ये लता मंगेशकर यांच्यासोबतच त्यांच्या भावंडांचं मोठं योगदान आहे.