ICC World Cup 2019: अमिताभ बच्चननंतर, ऋषी कपूरने वर्ल्ड कप, पाऊस आणि ICC वर अशी घेतली फिरकी- फोटो पाहा
(Image Credit: PTI)

पावसामुळे कुठल्याही स्पर्धेतले संघाचे सामने रद्द होणे हे खेळाडूंसह चाहत्यांसाठी हि निराशाजनक बाब आहे. एक चित्र सध्या इंग्लंड (England) मध्ये बघायला मिळत आहे. इंग्लंड मध्ये चालू असलेल्या विश्वकपमध्ये एका आठवड्यात तब्बल चार सामने पावसाच्या व्यथयमुळे रद्द करावे लागले. एकीकडे चाहते आयसीसीवर आपला रोष व्यक्त करत असताना, जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांनी एक गमतीशीर ट्विट केले आहे आणि सध्याची परिस्थिती पाहता तुम्ही सुद्धा ते मान्य कराल. ('Shift The World Cup 2019 To...': अमिताभ बच्चन म्हणाले या देशाला करु द्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, कारण वाचून तुमचं हसू आवरणार नाही)

ऋषी कपूर ने सध्या विश्वचषक स्पर्धेतील व्हायरल मेम ट्विटरवर शेअर केली आहे. ती आहे आयसीसी (ICC) विश्वकप ची टॉफी एका छत्रीच्या डिझाईन मध्ये. कपूर फोटो शेअर करताना म्हटले की, नवीन आयसीसी क्रिकेट विश्वचषक डिझाइन "हा विनोद कोणी शोधला?

ऋषी आधी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीही आयसीसीवर आपल्या वेगळ्याच अंदाजात टीका केली. एका गमतीशीर ट्विट मध्ये अमिताभ यांनी चक्क वर्ल्ड कप भारतात (India) घ्या, असा सल्ला आयसीसीला दिला. भारत हा एक देश आहे त्यामुले भारताला पावसाची जास्त गरज आहे म्हणून वर्ल्ड कपच भारतात आणा, असे गमतीशीर ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले होते.

यंदाच्या विश्वकपमध्ये पहिल्या 18 सामन्यापैकी 4 सामने पावसामुळे रद्द करावे लागले. याआधी 1992 आणि 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये प्रत्येकी 2 सामने रद्द झाले होते.