सपना चौधरी हिचा मित्रासोबतच्या रोमँन्टिक डान्समुळे चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर (Video)
सपना चौधरी (फोटो सौजन्य-Instagram)

हरियाणवी (Haryana) डान्सर सपना चौधरीचे (Sapana Choudhary) फॅनफॉलोअर्स दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. तर सपना सध्या तिच्या टिकटॉकवरील (TikTok) व्हिडिओमुळे सध्या सोशल मीडियात चर्चेत असते. तर नुकताच सपनाचा एका मित्रासोबतचा रोमँन्टिक अंदाजातील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

सपना चौधरी ही तिच्या मित्रासोबत बॉलिवूडमधील चुरा लिया है तुमने दिल को या गाण्यावर रोमँन्टिक अंदाजात डान्स करत आहे. मात्र सपनाचा या डान्समुळे चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला असून पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओखाली आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर म्हटले आहे सपना तु सिंगलच उत्तम आहे. असे व्हिडिओ प्लिझ पोस्ट नका करु असे म्हटले आहे.(सपना चौधरी हिला टशन देण्यासाठी उतरलीय कोमल रंगीली, हॉट डान्स व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांना घालतेय भुरळ Video)

 

View this post on Instagram

 

#sapnachoudhary #sapnachaudhary #sapna #haryanvi

A post shared by SAPNA & KARAN (@itskaranchoudhary) on

तर अजून एका व्हिडिओत सपना मित्रासोबत गोविंदाचे गाजलेले गाणे चलो इश्क लढाए यावर डान्स करताना दिसून येत आहे.

सपनाचा हा व्हिडिओ प्रचंड सोशल मिडियात व्हायरल झाला असून सर्वांच्या पसंदीस पडत आहे. तर सपना ही नुकतीच बॉलिवूडमधील एका चित्रपटात पोलिस वर्दीतील भुमिका साकारताना दिसून आली होती.