पुणे: अभिनेते डॉ. श्रीराम लागू अनंतात विलीन; कलाकार, चाहत्यांनी दिला साश्रू नयनांनी निरोप
श्रीराम लागू (Image Credit: Twitter)

मराठी, हिंदी सिनेसृष्टीसोबत अनेक भारतीय भाषांमधील सिनेमांमधून आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य करणारा 'नटसम्राट' डॉ. श्रीराम लागू (Dr. Shreeram Lagoo) यांच्या पार्थिवावर आज अंतिम संस्कार करण्यात आले आहेत. शासकीय इतमामात डॉ. लागूंना आदरांजली दिल्यानंतर त्यांना शेवटचा निरोप देण्यात आला आहे. दरम्यान कोणत्याही विधींशिवाय त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. लागूंना शेवटचा निरोप देण्यासाठी मराठी सिनेसृष्टी, राजकारणी मंडळी यांच्यासोबत चाहते उपस्थित होते. Dr. Shreeram Lagoo Dies: अमेय वाघ, उर्मिला मातोंडकर सह मराठी कलाकारांनी शेअर केले डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबतचे 'खास क्षण'! 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अभिनेत्री शुभांगी गोखले, उर्मिला मातोंडकर, राजन भिसे, अमोल पालेकर, जब्बार पटेल आदी कलाकारांनी पुण्यामध्ये डॉ. लागूंच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते.

राज ठाकरे यांनी घेतले अंतिम दर्शन 

डॉ. लागू यांना 17 डिसेंबरच्या रात्री हृद्यविकाराचा धक्का आला. त्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डॉ. लागूंचा मुलगा अमेरिकेत असल्याने त्याला भारतामध्ये परतण्यास दोन दिवस गेले. आज पुण्यामध्ये कुटुंबीयांच्या उपस्थितीत डॉ. लागूंना अखेर शेवटचा निरोप देण्यात आला.