'काश्मीर फाईल्स' (Kashmir Files) ही 32 वर्षांपूर्वी काश्मीरच्या बंडखोरीदरम्यान काश्मिरी पंडितांनी भोगलेल्या क्रूर त्रासाची सत्यकथा आहे. नरसंहारातील पीडितांच्या वेदना, संघर्ष आणि आघात यांचे हृदयद्रावक कथानक म्हणजे काश्मीर फाइल्स. कधीही न सांगितलेले सत्य, काश्मीर फाइल्स. अशा परिस्थितीत जेव्हा या चित्रपटाला इस्लामोफोबिक असे नाव दिले जाते, तेव्हा संताप येणे साहजिकच आहे. त्यामुळेच विवेक अग्निहोत्रीने (Vivek Agnihotri) याबाबत खुलेपणाने बोलण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी दिल्लीत (Delhi) झालेल्या पत्रकार परिषदेत (Press Conferance) दिग्दर्शक म्हणाला, “चिंतेची गोष्ट म्हणजे दहशतवाद. चित्रपटात मुस्लिम हा शब्द वापरला नाही. पाकिस्तान किंवा पाकिस्तानी हा शब्दही चित्रपटात वापरला नाही. चित्रपट फक्त दहशतवादावर बोलतो. मग त्याला टेरोफोबिक का म्हटले गेले नाही?
विवेक अग्निहोत्री पुढे सांगतात, 'द काश्मीर फाइल्स'च्या आधी 'फिजा', 'फना', 'मिशन काश्मीर' इत्यादी चित्रपटही काश्मीरवर आधारित होते, पण त्यांना कधीही इस्लामोफोबिक म्हटले गेले नाही. याचा अर्थ जर तुम्ही दहशतवाद्याला न्याय दिला तर तुम्ही मानवतेचे मसिहा आहात, पण जर तुम्ही दहशतवादाच्या विरोधात बोललात तर तुम्ही इस्लामोफोबिक आहात.”
दिग्दर्शक पुढे म्हणतात, "काश्मीर फाइल्सपूर्वी, काश्मीरवर सर्व चित्रपट मोठ्या प्रॉडक्शन हाऊसद्वारे बनवले गेले होते, ज्यात मोठ्या स्टार्सचा समावेश होता. ते सर्व चित्रपट 1990 च्या दशकात सेट केले गेले होते. एकाही चित्रपटात काश्मिरी हिंदू दाखवले गेले नाहीत. याबद्दल काहीही सांगितले गेले नाही. (हे देखील वाचा: Anek Trailer Out: अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'Anek' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत)
ते म्हणाले की, चित्रपटाच्या पहिल्या दृश्यात हिंदू आणि मुस्लिमांमधील बंधुभाव दिसून येतो. या दृश्यात “एक हिंदू मुलगा शिवाला वाईट लोक मारहाण करत आहेत आणि अब्दुल जाऊन त्याला वाचवतो. दुसऱ्या सीनमध्ये पुष्कर नाथने अब्दुलचा जीव वाचवला. वास्तविक, चित्रपटाचा सर्वात महत्त्वाचा निर्माता मुस्लिम आहे. तो इस्लामोफोबिक आहे का? हा चित्रपट देशातील इस्लामोफोबियाला प्रोत्साहन देत नाही, तर "दहशतवाद" विरुद्ध बोलतो.