बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान 2020 पर्यंत देशभरात सुरु करणार 300 जिम

यात 2020 पर्यंत देशभरात 300 जिम सुरु करण्याचा सलमानचा मानस आहे.

Salman Khan (Photo Credits: Instagram)

फिटनेस च्या बाबतीत नेहमीच आग्रही असलेला बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) आपल्या चाहत्यांना नेहमी फिटनेस फंडे देतच असतो. फिटनेस संबंधी अनेक व्हिडिओ सलमान सोशल मिडियावर शेअरही केले आहेत. असेच अनेक फिटनेस फंडे देण्यासाठी सलमान एक नवीन योजना आखत आहे. यात सलमान एसके-27 जिम (SK-27Gym) फ्रेंचायजी लाँच करण्याच्या तयारीत आहे. यात 2020 पर्यंत देशभरात 300 जिम सुरु करण्याचा सलमानचा मानस आहे.

यांसंदर्भातली एक पोस्टही सलमानने शेअर केली आहे. ज्यात त्याने असं म्हटलं आहे की, बीइंग ह्यूमन चेन आणि बीइंग स्ट्राँग फिटनेस इक्विपमेंट नंतर सलमान जिम आणि फिटनेस सेंटर ची साखळी सुरु करणार आहे.

त्यात आपल्या 100 पेक्षा जास्त जिममध्ये व्यायामाची आधुनिक उपकरणे सुद्धा आणली आहेत. एसके-27 लक्ष्य हे फिटनेस इंडिया मूवमेंटचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. त्याचबरोबर या मुळे फिटनेस प्रशिक्षकाला रोजगार सुद्धा उपलब्ध होईल.

हेही वाचा - सलमान खान चे अनोख्या अंदाजातील हे वर्कआऊट पाहून तुम्हीही व्हाल थक्क

एप्रिल मध्ये सलमानने आपले फिटनेस उपकरण ब्रँड बीइंग स्ट्राँग लाँच केले होते. हे उपकरण देशातील 175 पेक्षा जास्त जिममध्ये स्थापित केले आहे



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif