सलमान खानच्या सिनेमातून पदार्पण करणार मोहनीश बहेलची मुलगी
प्रत्यून बहेल (Photo Credits: Twitter)

कॅटरिना कैफ,अथिया शेट्टी, झरिन खान, सोनम कपूर, आयुष शर्मा आणि वरिना हुसेन अशा अनेक नव्या चेहर्‍यांच्या पाठीमागे सलमान खान गॉडफादर सारखा उभा राहिला आहे. केवळ अभिनेते नव्हे तर गायक, संगीतकारांनाच्या पाठीशीही सलमान उभा राहिला आहे. बॉलिवूडमध्ये यारों का यार म्हणून ओळख असलेला सलमान खान आता अजून एका अभिनेत्रीला लॉन्च करायला सज्ज झाला आहे.

सलमान खानचं खास ट्विट

 

अभिनेता मोहनीश बहेलची मुलगी आणि नूतन यांची नात प्रनूतन  बहेलला लॉन्च करण्यासाठी सलमान खान सज्ज आहे. सलमान खानच्या बॅनरखाली तयार होणार्‍या आगामी सिनेमामध्ये प्रत्यून मुख्य अभिनेत्रीच्या रूपात झळकणार आहे. प्रनूतन सोबत अभिनेता झहीर इक्बाल झळकणार आहे. सलमान खानच्या बालपणीच्या मित्राचा हा मुलगा आहे.

मोहनीश बहेलसोबत सलमान खानचे दोन सुपरहीट सिनेमे

मोहनीश बदल हा हम साथ साथ है आणि हम आपके है कौन ? या दोन सुपरहीट सिनेमांमध्ये सलमान खानचा मोठा भाऊ म्हणून झळकला होता. आताअ रूपेरी पदद्यावरील भावाच्या मुलीच्या पाठीशी सलमान उभा राहिला आहे. प्रनूतनचं स्वॅग से स्वागत' करण्याचं आवाहन ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे.

सलमान खान सध्या टेलिव्हिजनवर 'बिग बॉस 12'चं सूत्रसंचलन करत आहे. सोबतच अली अब्बासचा 'भारत' हा बहूप्रतिक्षित सिनेमामधून 2019च्या ईदला रसिकांच्या भेटीला येणार आहे.