रानू मंडल आणि हिमेश रेशमिया यांच्या आवाजातील बहुचर्चित गाणे 'तेरी मेरी कहानी' अखेर प्रदर्शित, Watch Full Video
Teri meri Kahani Song (Photo Credits: YouTube)

माणसाचे नशीब कधी, कुठे, कसं बदलेल हे सांगता येणार नाही. स्टेशनवर गायलेल्या एका गाण्याने रानू मंडलचे (Ranu Mandal) अख्ख आयुष्य बदलून गेले. तिच्या गाण्याच्या व्हायरल व्हिडिओने तिला एवढं प्रसिद्ध केलं की तिने चक्क काही दिवसांतच प्रसिद्ध गायक हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) यांनी आपल्या आगामी चित्रपटात गाण्याची संधी दिले. गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेले 'तेरी मेरी कहानी' हे गाणे अखेर प्रदर्शित झाले आहे.

काही दिवसांपूर्वी हिमेश रेशमिया-रानू मंडल यांचे हे गाणे गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या गाण्याचा संपुर्ण व्हिडिओ पाहा येथे

गायक हिमेश रेशमिया चा आगामी चित्रपट 'हॅप्पी हार्डी अँड हीर' (Happy Hardy and Heer)मधील हे गाणे आहे. हा चित्रपटात प्रदर्शित होण्यापूर्वीच रानू मंडल हिच्या आवाजातील हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. हे गाणे युट्यूबवर प्रदर्शित होताच 18 लाखाच्या वर लोकांनी हे गाणे पाहिले आहे.

हेदेखील वाचा- रेल्वे स्टेशनवर गाणारी रानू मंडल रातोरात झाली स्टार, हिमेश रेशमिया सोबत गायले हे सुंदर गाणे, Watch video

पश्चिम बंगालच्या (West Bengal)च्या राणाघाट रेल्वे स्टेशनावर रानूचा जो व्हिडिओ व्हायरल झाला, ज्याने तिचे अख्ख आयुष्य बदलून गेले. इतकचं नव्हे तर तिच रुपडंही पालटलं.