अनोख्या हेअरस्टाईलमुळे प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर ट्रोल; पहा व्हिडिओ
या व्हिडिओमध्ये तिने आपल्या केसांची अनोथी हेअरस्टाईल केली आहे. या हेअरस्टाईलमुळे प्रियंकाला नेटीझन्सनी ट्रोल केलंय. या व्हिडिओमध्ये प्रियंका एका गाण्यावर बाथरोब परिधान करुन थिरकताना दिसत आहे. मात्र, चाहत्यांना प्रियांकाची ही अनोखी हेअरस्टाईल फारशी आवडलेली नाही.
बॉलिवुड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने आपल्या केसांची अनोथी हेअरस्टाईल (Hairstyle) केली आहे. या हेअरस्टाईलमुळे प्रियंकाला नेटीझन्सनी ट्रोल केलंय. या व्हिडिओमध्ये प्रियंका एका गाण्यावर बाथरोब परिधान करुन थिरकताना दिसत आहे. मात्र, चाहत्यांना प्रियांकाची ही अनोखी हेअरस्टाईल फारशी आवडलेली नाही.
प्रियंकाचा हा नवा लूक पाहून अनेक यूजर्संनी तिला या अनोख्या हेअरस्टाईलबद्दल प्रश्न विचारले आहेत. ‘ही कोणती हेअरस्टाईल आहे?, 'पर्वत’, ‘केसांचा पर्वत’, ‘शाकालाका बुमबुम मालिकेमधील पेन्सिल जर माणूस असती तर अशी दिसली असती’, अशा आशयाच्या मजेशीर प्रतिक्रिया प्रियंकाच्या नव्या लूकवर यूजर्सकडून येत आहेत. (हेही वाचा - कुटुंबियांना वेळ देता यावा म्हणून ‘एक्सप्रेशन क्वीन’ प्रिया वारियर ने डिअॅक्टीव्हेट केलं इन्स्टाग्राम अकाऊंट)
प्रियंकाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्रियंकाचा हा व्हिडिओ अनेकांनी पाहिला असून आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर नेहमी आपल्या नव्या लूकचे फोटो तसेच व्हिडिओ शेअर करत असते. मात्र, अनेक फोटोजवरून तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागते.