दीपिका-रणवीर यांनी लग्नाच्या पहिला वाढदिवसाच्या निमित्ताने घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन, पाहा फोटो

'दीप-वीर'ची जोडी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाठी (Wedding Anniversary) काय योजना आखणार? तसेच परदेशात कुठे फिरायला जाणार? याबाबत त्यांच्या चाहत्यांना अधिक उत्सुकता होती.

Deepika padukone And Ranveer Singh (Photo Credit:Instagram)

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक प्रसिद्धी मिळवणारी रणवीर सिंह- दीपिका पादुकोण (Ranveer Singh- Depeeka Padukon) या कलाकारांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात लग्न केले होते. 'दीप-वीर'ची जोडी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाठी (Wedding Anniversary) काय योजना आखणार? तसेच परदेशात कुठे फिरायला जाणार? याबाबत त्यांच्या चाहत्यांना अधिक उत्सुकता होती. मात्र, दीप-वीर यांनी त्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले असून त्यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर तिरुपती बालाजी मंदिराच्या जवळ असणाऱ्या पद्मावती मंदिरातही ते जाणार आहेत. या दोन्ही ठिकाणी दर्शन झाल्यानंतर ते थेट अमृतसर येथील सुवर्णमंदिरात जाणार आहेत.

रणवीर सिंह आणि दीपिका यांनी रामलीला चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. त्यानंतर अनेक प्रसिद्ध चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले आहे. दरम्यान, दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झाल्याची चर्चा रंगली होती. यातून गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांनी लग्न गाठ बांधली. यांच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाले असून त्या दोघांनेही त्याच्या पहिला वाढदिवस धार्मिक स्थळांना भेट देऊन साजरा करायचे ठरवले. त्यानुसार त्यांनी प्रथम तरुपती बालाजीला भेट देणार आहेत. त्यानंतर तिरुपती बालाजी मंदिराच्या जवळच असणाऱ्या पद्मावती मंदिरातही ते जाणार आहेत. या दोन्ही मंदिरात भेट दिल्यानंतर ते दोघेही अमृतसर येथील सुवर्णमंदिरात जाऊन आशिर्वाद घेणार आहे. हे देखील वाचा- तानाजी सिनेमामध्ये शरद केळकर साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

इंस्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

As we celebrate our first wedding anniversary,we seek the blessings of Lord Venkateswara.Thank You all for your love,prayers and good wishes! @ranveersingh

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दरम्यान, 'आम्ही आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त व्यंकटेश्वाराचे आशीर्वाद घेतले. आम्हाला शुभेच्छा देणाऱ्या, आम्हा दोघांना आशीर्वाद देणाऱ्या आणि आमच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे आभार...' असे लिहून दीपिकाने तिचा आणि रणवीरचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.