Radhey Shyam Teaser: व्हॅलेंटाईन डे निमित्त प्रभासने चाहत्यांना दिलं खास गिफ्ट; 'राधे श्याम' चित्रपटाचा टिझर रिलीज, पहा व्हिडिओ

प्रभास आणि पूजा हेगडे यांचे लाखो चाहते चित्रपटाच्या टीझरला लाईक करत आहेत. त्याचवेळी टीझरसह हा चित्रपट सिनेमागृहात कधी रिलीज होणार आहे, हेही समोर आलं आहे.

Radhey Shyam Teaser (PC - YouTube)

Radhey Shyam Teaser: दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आपल्या आगामी अनेक चित्रपटांसाठी चर्चेत आहे. त्यातील एक चित्रपट म्हणजे 'राधे श्याम'. प्रभासचा हा चित्रपट बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आहे. आता या चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज झाला आहे. व्हॅलेंटाईन डे च्या खास प्रसंगी प्रभास आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांना 'राधे श्याम' चित्रपटाच्या टीझरची खास भेट दिली आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये प्रभास एका प्रियकराच्या भूमिकेत दिसत आहे. त्याचवेळी या चित्रपटाची प्रमुख अभिनेत्री पूजा हेगडेसुद्धा टीझरमध्ये दिसली आहे. टीझरमध्ये दोघेही डायलॉग बोलताना दिसत आहेत. टीझरमध्ये पूजा हेगडे प्रभासला म्हणते की, 'तू स्वत: ला रोमियो समजतोस का?', यावर प्रभास म्हणतो, 'नाही, त्याने प्रेमापोटीच आपला जीव दिला होता, मी त्या प्रकारातील नाही'.

सोशल मीडियावर 'राधे श्याम' हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रभास आणि पूजा हेगडे यांचे लाखो चाहते चित्रपटाच्या टीझरला लाईक करत आहेत. त्याचवेळी टीझरसह हा चित्रपट सिनेमागृहात कधी रिलीज होणार आहे, हेही समोर आलं आहे. प्रभास आणि पूजा हेगडे यांचा हा बहुचर्चित चित्रपट यावर्षी 30 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. (वाचा - Jacqueline Fernandez ने इंस्टाग्रामवर शेअर केले Aerial Yoga करतानाचे खास फोटो; See Photos)

दरम्यान, ‘राधे श्याम’ हा एक पीरियड रोमँटिक-ड्रामा चित्रपट आहे. हा बहुभाषिक चित्रपट असेल जो हिंदी व्यतिरिक्त इंग्रजी आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. वामसी कृष्णा रेड्डी, प्रमोद अप्पलापथी आणि भूषण कुमार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रभासच्या कारकीर्दीचा हा 20 वा चित्रपट आहे.

या चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ भाग्यश्री देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. आता ‘राधे श्याम’ चित्रपटाशी संबंधित अनेक पोस्टर प्रसिद्ध झाले आहेत. या पोस्टर्समध्ये प्रभास आणि पूजा हेगडेचा लूक दिसत आहे. यापूर्वी प्रभास 'डार्लिंग' चित्रपटात लवर बॉय च्या भूमिकेत दिसला होता.

याशिवाय प्रभास त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यात तो भगवान रामच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचवेळी सैफ अली खान 'आदिपुरुष'मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगण भगवान शिवच्या भूमिकेत दिसू शकतो, अशी चर्चा आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif