Ganesh Chaturthi 2020: सलमान खान याने कुटुंबियांसह केली बाप्पाची आरती (Watch Video)

यंदा सोहेल खान याच्या घरी खान कुटुंबियांचा बाप्पा विराजमान झाला आहे. संपूर्ण कुटुंब सोहेलच्या घरी दाखल झाले असून सगळ्यांनी एकत्र येऊन बाप्पाची आरती देखील केली. पहा व्हिडिओ...

सलमान खानचे कुटुंब बाप्पाची आरती करताना (Photo Credit: Twitter)

दरवर्षी प्रमाणे यंदाही सलमान खान (Salman Khan) याच्या कुटुंबाने गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले. यंदा सोहेल खान (Sohail Khan) याच्या घरी खान कुटुंबियांचा बाप्पा विराजमान झाला आहे. बाप्पासाठी यंदा खास फुलांची सजावट करण्यात आली. बाप्पाच्या दर्शनासाठी संपूर्ण खान कुटुंब सोहेल खानच्या घरी दाखल झाले आहे. तर सलमान खान याची कथित गर्लफ्रेंड  यूलिया वंतूर आणि अरबाज खान याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी देखील खान कुटुंबियांच्या गणेशोत्सवात सहभागी झाल्या आहेत. या सर्वांनी एकत्र गणपती बाप्पाची आरती केली. याचा व्हिडिओ सलमान खानचा जीजू (मेव्हणा) अतुल अग्निहोत्री याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओत सलीम खान, सलमा खान, हेलन, सलमान, अरबाज, सोहेल, अलवीरा आणि अर्पिता बाप्पाची आरती करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे घरातल्या लहान मुलांनी देखील बाप्पाच्या आरतीचा आनंद घेतला. (कथित गर्लफ्रेंड यूलिया वंतूर सह सलमान खान गणपती दर्शनासाठी सोहेल खान याच्या घरी दाखल; पहा Photos)

पहा व्हिडिओ:

सलमान खानची बहिण अर्पिताचा पती आणि अभिनेता आयुष शर्माने देखील त्याच्या मुलांचा बाप्पासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Ganpati Bappa Morya

A post shared by Aayush Sharma (@aaysharma) on

यापूर्वी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी सोहेलच्या घरी जाताना खान कुटुंबियांना स्पॉट करण्यात आले होते. दरम्यान यंदा कोविड-19 संकटामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जात आहे. त्यामुळे यंदा सलमान खानच्या गणपती  बाप्पाची मिरवणूक चाहत्यांना पाहता येणार नाही.



संबंधित बातम्या