दीपिका पादुकोण रूपेरी पडद्यावर साकारणार अ‍ॅसिडहल्ल्यात बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालचा संघर्ष
दीपिका पदुकोण

पद्मावत सिनेमातील दीपिका पादूकोणच्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं. या बिग बजेट प्रोजेक्टने सारे अडथळे पार करून बॉक्सऑफिसवर कमाल कामगिरी केली आहे. या सिनेमानंतर दीपिका कोणता प्रोजेक्ट करणार? ही उत्सुकता चाहत्यांच्या मनात होती. मात्र लवकरच दीपिका मेघना गुलजारच्या चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे.

राजी चित्रपटाच्या यशानंतर मेघना गुलजार अ‍ॅसिड हल्ल्यामधील पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या भूमिकेत दिसणार आहे. मुंबई मिररच्या वृत्तानुसआर दीपिका पादुकोण लवकरच लक्ष्मीच्या जीवनावरील चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या सिनेमाचं नाव अजूनही ठरवण्यात आलेले नाही.

गहिवरली दीपिका

लक्ष्मीच्या आयुष्यातील हा दुर्दैवी प्रकार ऐकल्यानंतर दीपिकाच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. अ‍ॅसिड हल्ल्यानंतर पुन्हा ताकदीने, हिंमतीने उभ्या राहिलेल्या लक्ष्मीच्या जिद्दीचं कौतुक असल्याची भावना दीपिकाने बोलून दाखवली आहे. या प्रभावशाली कहाणीमुळे हा प्रोजेक्ट निवडल्याचंही दीपिका सांगते.

लक्ष्मी अग्रवालवर 2005 साली अ‍ॅसिड हल्ला झाला होता. त्यवेळेस लक्ष्मी केवळ 15 वर्षांची होती. लक्ष्मीवर अ‍ॅसिड हल्ला करणारी व्यक्तीही तिच्या परिवारातील ओळखीची होती. 2006 साली या प्रकारानंतर लक्ष्मी न्यायालयीन लढाई लढली. कोर्टात या प्रकरणाच्या निकालानंतर अ‍ॅसिड विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. लक्ष्मी आज छांव फाऊंडेशन ही एनजीओ चालवते.