मलायका अरोरानंतर २२ वर्षीय लहान गर्लफ्रेंडसोबत अरबाज पुन्हा बोहल्यावर ?
अरबाज खान, जॉर्जिया अॅड्रियानी आणि मलायका अरोरा (Photo Credits: Yogen Shah)

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा यांना वेगळे होवून वर्षभरापेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्यानंतर अरबाज जॉर्जिया अॅड्रियानी नावाच्या मुलीला टेड करत असल्याच्या चर्चेला उधाण आले. सोशल मीडियावर यांचे फोटोज चांगलेच व्हायरल झाले होते.

आता लवकरच अरबाज दुसऱ्यांचा बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. जॉर्जियासोबत अरबाज नव्या आयुष्याची सुरुवात करणार असल्याचे म्हटले जात आहे. अलिकडेच जॉर्जिया अरबाजसोबत गणपती दर्शनासाठी अर्पिता खान शर्माच्या घरी गेली होती. तर मलायका अरोरा देखील अर्पिताच्या घरी दाखल झाली होती.

जॉर्जिया आणि मलायका एकमेकींचा आदर करतात. त्यामुळे त्यांच्यात कोणताही वाद नाही.

लवकरच अरबाज जॉर्जियासोबत लग्न करण्यासंबंधित आपल्या कुटुंबियांशी चर्चा करणार आहे. चर्चा सफल झाल्याच लवकरच खान कुटुंबात शहनाई वाजणार आहे.

जॉर्जिया फक्त २९ वर्षांची असून अरबाज ५१ वर्षांचा आहे. आपल्यापेक्षा २२ वर्षांनी लहान मुलीशी अरबाज लवकरच विवाहबद्ध होणार आहे.

अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी १७ वर्षांचे वैवाहिक जीवनाला पूर्णविराम लावला. विभक्त झाल्यानंतरही मलायका मात्र खान कुटुंबियांच्या प्रत्येक सेलिब्रेशनमध्ये सहभागी होते.