
Akshay Kumar Announces Welcome To The Jungle : आज बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. खिलाडी अक्षय कुमार आज वाढदिवसानिमित्त महाकालच्या दर्शनासाठी उज्जैनला गेला होता. आज चाहत्यांना खुशखबर देत सोशल मीडियावर नवीन चित्रपटाची घोषणा केली. वेलकम टू द जंगल या चित्रपटाची घोषणा केली. सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. टीझर पाहून चाहत्यांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहे.
कलाकारांमध्ये संजय दत्त, सुनील शेट्टी, अर्शद वारसी, परेश रावल, जॉनी लीव्हर, राजपाल यादव, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कृष्णा अभिषेक, किकू शारदा, दलेर मेहंदी, मिका सिंग, राहुल देव, मुकेश तिवारी, शारीब हाश्मी, इनामहुल, श्रेयस, श्रेयस यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. झाकीर हुसेन, यशपाल शर्मा, रवीना टंडन, लारा दत्ता, जॅकलीन फर्नांडिस, दिशा पटानी आणि वृही कोडवारा यांचा समावेश आहे.
टीझर पाहून हा चित्रपट कॉमेडी स्वरुपात असेल असं वाटत आहे. अभिनेत्याने चित्रपटाचा पहिला टीझर शेअर करत त्याला कॅप्शन दिले, " मला आणि तुम्हाला आज एक बर्थडे गिफ्ट दिलं आहे. जर तुम्हाला ते आवडलं तर धन्यवाद म्हणा, तर मी म्हणेन वेलकम(3) #WelcomeToTheJungle. सिनेमांमध्ये, ख्रिसमस - 20 डिसेंबर , 2024." हा चित्रपट पुढच्या वर्षी ख्रिसमसच्या निमित्तावर थिएटर मध्ये येईल.