81st Dinanath Mangeshkar Award: आशा भोसले, विद्या बालन ते प्रसाद ओक पहा यंदाच्या मंगेशकर पुरस्काराचे मानकरी कोण?
हा पुरस्कार मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला होता
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान कडून दिल्या जाणाऱ्या मानाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांना यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan), अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) या कलाकारांसह एकूण 7 मानकरी काल जाहीर करण्यात आले आहेत. 24 एप्रिल रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. दरवर्षी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदीनाचं औचित्य साधून 24 एप्रिलला या मानाच्या पुरस्काराचा प्रदान सोहळा होणार आहे. सायनच्या षण्मुखानंद सभागृहामध्ये हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे.
81 व्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांमध्ये पंकज उदास यांना संगीत विभागामध्ये, प्रशांत दामले यांना नाटक विभागात सर्वोत्कृष्ट नाटक- प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनचे गौरी थिएटर्सचे 'नियम व अटी लागू', प्रसाद ओक, विद्या बालन यांना सिनेमा विभाग आणि श्री सदगुरू सेवा संघ यांना समाजसेवा आणि साहित्यासाठी ग्रंथाली प्रकाशनाला पुरस्कार जाहीर झाला आहे.
प्रसाद ओक
षण्मुखानंद सभाग़ृहामध्ये या पुरस्कार सोहळ्याच्या वेळेस कथ्थक नृत्य. राहुल देशपांडे यांचं गायन आणि हरिहरन यांच्या लाईव्ह परफॉर्मंसचं आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या वर्षीपासून, मंगेशकर कुटुंबीय आणि ट्रस्टकडून भारतरत्न लता दीदींच्या स्मरणार्थ 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' देण्यास सुरूवात केली आहे. हा पुरस्कार मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला होता. तर यंदा आशा भोसले या मानाच्या पुरस्काराचे मानकरी ठरल्या आहेत. आशा भोसले या लता मंगेशकर यांच्या कनिष्ठ भगिनी आहेत. त्यांनी देशा-परदेशामध्ये आपल्या आवाजाने, ठसकेबाज अंदाजाने रसिकांना भूरळ पाडली आहे. बॉलिवूड, प्रादेशिक भारतीय भाषांसोबतच काही परदेशी गायकांसोबतही त्यांनी गाणी गायली आहेत.