पहिल्यांदाच सचिन तेंडूलकरने मॉडिफाय केली BMW स्पोर्टकार; असा आहे गाडीचा नवा लूक
सचिची BMW i8 (संग्रहित-संपादित प्रतिमा)

सचिन तेंडूलकरचे क्रिकेटनंतर कारप्रेम सर्वांना ठाऊक आहे. सचिनच्या ताफ्यामध्ये अनेक लोकप्रिय कार्स आहेत. त्यातल्या त्यात सचिन बीएमडब्ल्यू (BMW) चा चाहता आहे. त्याच्याकडे BMW 7-Series, BMW M3, BMW M4 या कार आहेतच, पण सचिनकडे BMW i8 ही एक खास स्पोर्टकारही आहे, जी त्याने  2016 साली खरेदी केली होती. निळ्या पांढऱ्या रंगाच्या या गाडीमधून सचिनचे अनेकवेळा दर्शन घडले आहे. मात्र आता सचिनचे पहिल्यांदाच या गाडीचा संपूर्ण लूक बदलून टाकला आहे, सचिनने ही गाडी मॉडिफाय केली आहे. आता या गाडीचा रंग लाल आणि निळा झाला आहे.

सचिनने या कारला प्रसिद्ध कार डिझायनरकडून, डीसी डिझाईनकडून मॉडिफाय करून घेतले आहे. या कारचे बंपर बदलण्यात आले आहेत. तसेच कस्टम मेड ग्रील लावण्यात आले आहेत. मागील बंपरला व्हेंटेड पॅनेल लावल्याने ही कार रुंद दिसत आहे. या कारमध्ये इलेक्ट्रीक मोटरसह 3 सिलिंडरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही कार 4.4 सेकंदांत 100 किमीचा वेग पकडते. (हेही वाचा: 'महिंद्रा'ने सादर केली जगातील सर्वात वेगवान कार; 2 सेकंदात पकडणार 100 KPH गती)

दरम्यान, सचिनने विकत घेतलेली पहिली कार मारूती 800 होती. ही कार अतिशय साधी मानली जात असली तरी त्या काळी ही कार घेणे खूप मोठी गोष्ट होती. भारताच्या कसोटी क्रिकेट संघात निवड झाल्यानंतर 1989 मध्ये सचिनने मारूती 800 विकत घेतली होती. त्यानंतर त्याच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या कार जमू लागल्या. सध्या बीएमडब्लू आणि ऑडीपर्यंत सर्व कार त्याच्याकडे आहेत.