Mercedes  नंतर आता Jaguar कडून आपल्या पहिल्याच इलेक्ट्रिक कारची घोषणा
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

Jaguar I-Space First Electric Car:  भारतात आलिशान इलेक्ट्रिक गाड्यांनी आपला वेग पकडण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षात मर्सिडिजने आपली पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करतया सेगमेंट मध्ये एन्ट्री केली होती. त्यानंतर आता जॅग्युआर ने आपली पहिली इलेक्ट्रिक एसयुवी लॉन्च करण्यासाठी तयारी केली आहे. कंपनीची ही पहिलीच इलेक्ट्रिक कार असून ती भारतात येत्या 9 मार्चला लॉन्च केली जाणार आहे. जी भारतात इलेक्ट्रिक आलिशान कार मर्सिडिज बेंज EQC ला टक्कर देणारी ठरणार आहे.(MG Motors कंपनी येत्या 8 फेब्रुवारीला भारतात लाँच करणार MG ZS EV 2021, काय असतील याची खास वैशिष्ट्ये)

एका महिन्यापूर्वी जॅग्युआरने भारतात आय-पेस च्या लॉन्चिंगची घोषणा केली होती. ज्यामध्ये कंपनी 90kWh च्या बॅटरी पॅकचा वापर करणार आहे. जी दोन मॅग्नेट सिंक्रोनस इलेक्ट्रिक मोटर्ससह 39hp ची पॉवर आणि 696Nm चा टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असणार आहे. I-Pace च्या स्पीड बद्दल बोलायचे झाल्यास ही 4.8 सेकंदात 0-100 किमी प्रति ताशी वेग पकडणार आहे. याची टॉप स्पीड जवळजवळ 200kph पर्यंत मर्यादित आहे.

कारची लांबी 4682 मिमी, रुंदी 2139 मिमी आणि उंची 1565 मिमी असणार आहे. त्याचसोबत यामध्ये 2990 मिमीचा व्हिलबेस दिला जाणार आहे. ड्रायव्हिंग रेंज बद्दल बोलायचे झाल्यास WLTP परिक्षण चक्रानुसार I-Pace 470 किमी ड्रायव्हिंग रेंजसह उतरवली जाणार आहे.(Skoda च्या नव्या एसयुवीचा टीझर आला समोर, 10 लाखांची कार मार्च मध्ये लॉन्च होण्याची शक्यता)

Jaguar I-Pace मध्ये 90kWh च्या बॅटरी पॅकमध्ये 432 सेल्सचा पॅक दिला गेला आहे. तो 50kW डीसी फास्ट चार्जरचा वापर करुन फक्त 85 मिनिट्स मध्ये 0-80 टक्के चार्ज करु शकणार आहे. तर 100kW चार्जरचा उपयोग करुन ती फक्त 45 मिनिटांत चार्ज केली जाऊ शकणार आहे. आय पेस 7kW एसी बॉल बॉक्ससह चार्ज होण्यासाठी 10 तासांचा वेळ लागणार आहे. सध्या याच्या किंमतीबद्दल कोणताच खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु याची किंमत 1 कोंटीहून अधिक असण्याची शक्यता आहे.