Cars Under 10 Lakh: देशात 10 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'या' 5 नवीन गाड्या; 2024 मध्ये होणार लॉन्च, जाणून घ्या सविस्तर
Kia Sonet (Photo Credits: Kia)

Cars Under 10 Lakh: भारतात प्रिमियम कारची मागणी वाढत असली तरी परवडणाऱ्या कारचे (Affordable Cars) खरेदीदार कमी झालेले नाहीत. परवडणाऱ्या श्रेणीतील वाहने शोधणारे बरेच लोक आहेत. अशात कार मार्केटमध्ये 10 लाखांपेक्षा कमी किमतीच्या वाहनांना जास्त मागणी आहे. अनेक ऑटोमोबाईल कंपन्या आपली नवीन उत्पादने भारतीय बाजारपेठेत उतरवण्याच्या तयारीत आहेत आणि 2024 मध्ये, वेगवेगळ्या कार उत्पादक कंपन्या या मिड सेगमेंटमध्ये त्यांच्या कार सादर करतील. यामध्ये हॅचबॅक, सेडान आणि एसयूव्ही वाहनांचा समावेश आहे.

मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift)-

ही मारुती सुझुकीची मोस्ट अवेटेड हॅचबॅक कार आहे. नुकतीच ही कार जपानमध्ये शोकेस करण्यात आली. ही कंपनीची फोर्थ जनरेशनची कार आहे, जी भारतात 2024 च्या सुरुवातीला लॉन्च केली जाईल. नवीन स्विफ्टला HEARTECT प्लॅटफॉर्म मिळेल, ज्यामुळे ते रस्त्यावर पूर्वीपेक्षा अधिक स्मूथ धावेल. ही गाडी 30 ते 40 kmpl दरम्यान मायलेज देईल. यामध्ये सीएनजी आणि पेट्रोल दोन्हीचा पर्याय उपलब्ध असेल.

किआ सोनेट (Kia Sonet)-

किआ सोनेटने नुकतेच या कारचे अनावरण केले आहे. सध्या त्याची किंमत जाहीर केलेली नाही, पण अंदाज आहे की या गाडीसाठी प्रारंभिक किंमत 8 लाख रुपये एक्स-शोरूमवर ऑफर केली जाईल. त्याचे बेस मॉडेल (10 लाखांखालील कार) सध्या बाजारात 7.5 लाख रुपये एक्स-शोरूममध्ये आहे. सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम यासारखी प्रगत फीचर्स असलेले, त्याचे टॉप मॉडेल 10 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीत उपलब्ध असेल.

मारुती सुझुकी डिझायर (Maruti Suzuki Dzire)-

कंपनीची ही फोर्थ जनरेशनची कार असेल. कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये या कारला जास्त मागणी आहे. ही कार मार्च 2024 पर्यंत लॉन्च होईल. सीएनजी व्यतिरिक्त, यात पॉवरफुल 1.2 लीटर पेट्रोल इंजिन मिळेल. कारमध्ये 3 सिलेंडर इंजिन आहे, हे इंजिन पर्वत आणि चिखल इत्यादीमध्ये हाय पॉवर निर्माण करते. विशेष बाब म्हणजे ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही प्रकारात येईल. यामध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स असतील. या कारमध्ये माईल्ड हायब्रीड पर्यायही उपलब्ध असेल.

टाटा अल्ट्रोझ फेसलिफ्ट (Tata Altroz Facelift)-

टाटा मोटर्सची ही नवीन कार पूर्णपणे न्यू जनरेशनची असेल. त्याचा फ्रंट लुक खूपच फ्युचरिस्टिक करण्यात आला आहे. जुन्या कारच्या तुलनेत नवीन कारमध्ये मोठी 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल. याशिवाय यामध्ये 7 इंची डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात येत आहे. कारचे इंटीरियर पूर्वीपेक्षा अधिक दर्जेदार करण्यात आले आहे. यामध्ये ड्युअल टोनचा पर्याय उपलब्ध असेल. कारच्या पॉवरट्रेनमध्ये कोणतेही बदल केले जात नाहीत. कारच्या इंटिरिअरला पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (हेही वाचा: Kinetic Green ने भारतीय बाजारात लाँच केली Zulu Electric Scooter; जाणून घ्या किंमत आणि खास वैशिष्ट्ये)

निसान मॅग्नाइट फेसलिफ्ट (Nissan Magnite Facelift)-

कार उत्पादक निसान आपल्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही मॅग्नाइटच्या फेसलिफ्टवर काम करत आहे. हे वाहन 2024 च्या मध्यापर्यंत भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले जाऊ शकते. या कारमध्ये पाच आणि सात सीट असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. अधिक सामानासह प्रवास करण्यासाठी, तुम्ही कारची मागील सीट काढून बहुउद्देशीय कार म्हणून वापरू शकता. ही मध्यम आकाराची एसयूव्ही आहे. कारची लांबी 3994 मिमी, रुंदी 1758 मिमी आहे. आरामदायी प्रवासासाठी त्याची उंची 1572 मिमी ठेवण्यात आली आहे.