Hera Pheri 3: 'हेरा फेरी-3' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस; निर्मात्यांनी दिली माहिती
चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा शेवट असा होता की, लवकरच त्याचा तिसरा भाग प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसेल. मात्र, आतापर्यंत चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली नसून, ते तिसर्या भागाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. पण आता या चित्रपटाच्या तिसर्या भागाबाबत अशी बातमी समोर येत आहे, की लवकरच हे त्रिकूट चित्रपटगृहात परतण्याची शक्यता आहे.