दाक्षिणात्य सुपरस्टार विजय च्या घरावर आयकर विभागाचे छापे; फायनान्सरच्या घरात सापडल्या पैशाने भरलेल्या बॅगा
एजीएस एंटरप्रायजेस या कंपनीवरील छापेमारीदरम्यान, सुपरस्टार विजयला 'बिगिल' या सिनेमासाठी दिलेल्या पैशांवरुन गडबड झाल्याचं आढळलं. त्याबाबत आयकर विभागाने अधिक चौकशी केली. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विजयला या सिनेमासाठी मोठी रक्कम मिळाल्याची माहिती आधीच आयकर विभागाला लागली होती. त्यानुसार, त्यांच्या त्या दिशेने तपास सुरु होता.