प्रसारण मंत्रालयाकडून 22 YouTube चॅनल ब्लॉक, भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध यांबाबत चुकीचे वृत्त दिल्याने कारवाई
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियम, 2021 अंतर्गत विशेष तत्कालीन अधिकारांचा वापर करून, 04.04.2022 रोजी बावीस (22) यूट्यूब वृत्तवाहिन्या, तीन (3) ट्वीटर खाती, एक (1) फेसबुक खाते, एक (1) बातम्यांवर आधारीत संकेतस्थळ अवरोधित (ब्लॉक) करण्याचे आदेश जारी केले आहेत.